महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहमदनगर जिल्ह्यात कोणाला मिळाले संधी ?

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की लगेचच आचारसंहिता लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांचा देखील समावेश आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 12 जागा आहेत. यापैकी शेवगाव विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Vidhansabha Nivdnuk 2024

Maharashtra Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता अख्या महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याचीच सारेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढल्या महिन्यात अर्थातच ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की लगेचच आचारसंहिता लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांचा देखील समावेश आहे.

जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 12 जागा आहेत. यापैकी शेवगाव विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावर जोरदार मंथन सुरू आहे.

जागा वाटपावर अजून दोन्ही गटांमध्ये घटक पक्षांमध्ये एकमत झालेले नाहीये. दोन्हीही गट जागा वाटपावरून आमच्यात कोणतेच मतमतांतरे नसल्याचा दावा करत आहेत. मात्र प्रत्यक्षात जागा वाटपावरून दोन्ही गटांचे अजून काहीही निश्चित झालेले नाही. पण, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार फायनल करण्यात लीड घेतली आहे.

पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून येत्या काही दिवसांनी इतर पक्ष देखील त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. आता आपण वंचित बहुजन आघाडीने किती उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत आणि शेवगाव विधानसभा मतदारसंघात कोणाची वर्णी लागली आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली पहिली यादी खालील प्रमाणे

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अकरा उमेदवारांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बारा पैकी एका विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवार फायनल केला आहे. शेवगाव विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी कडून किसन चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता आपण वंचितच्या उर्वरित दहा उमेदवारांची नावे जाणून घेणार आहोत.

रावेर विधानसभा मतदारसंघ : शमिभा पाटील
शिंदखेड राजा विधानसभा : सविता मुंढे
वाशिम : मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे : निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण मध्य : विनय भागणे
साकोली : डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण : फारुख अहमद
लोहा : शिवा नारांगले
औरंगाबाद पूर्व : विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव : किसन चव्हाण
खानापूर : संग्राम कृष्णा माने

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe