‘या’ तारखेला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होणार, आचारसंहिता कधी लागणार ? शरद पवार यांचा दावा

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकताच महाराष्ट्र दौरा केला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार अशी शक्यता आहे. आयोगाने देखील महाराष्ट्रातील विधानसभा विसर्जित होण्याआधीच निवडणुका होतील असे जाहीर केले आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटातील इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

खरंतर महाराष्ट्र विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होणार आहे. यामुळे विधानसभा विसर्जित होण्याआधीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. पण अजूनही भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.

तथापि केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकताच महाराष्ट्र दौरा केला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार अशी शक्यता आहे. आयोगाने देखील महाराष्ट्रातील विधानसभा विसर्जित होण्याआधीच निवडणुका होतील असे जाहीर केले आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. अशातच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका कधी होणार यासंदर्भात मोठे भाकीत वर्तवले आहे.

बारामती मध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना आगामी निवडणुकीबाबत शरद पवारांनी मोठे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राज्यात निवडणुका कधी होणार याची संभाव्य तारीख सुद्धा सांगितली आहे.

राज्यात केव्हा होणार विधानसभेच्या निवडणुका?

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना, सध्या महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण आहे, लोकसभेला वेगळं चित्र होतं. राज्यातील जनतेचा मूड वेगळा आहे.

कुठंही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोकं भेटतात. लोकांच्यात खात्री झाली की या निवडणुकीत काही झालं तरी जिंकायचं आहे. म्हणून चांगले निकाल लागतील यात शंका नाही.

निवडणूक आयोग लवकरच तारीख ठरवेल, माझा अंदाज आहे की निवडणूक आयोग 6 ते 10 च्या दरम्यान तारखा जाहीर करेल आणि 15 ते 20 नोव्हेंबर च्या दरम्यान मतदान होईल असा अंदाज असल्याचं विधान शरद पवारांनी केले आहे.

खरे तर जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतात त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागत असते. यामुळे आता भारतीय निवडणूक आयोग प्रत्यक्षात निवडणुकांच्या तारखा कधी डिक्लेअर करणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe