महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य, हायकमांडने जर……

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचे अनेकदा म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी ठाकरे गटापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घ्यायचा अशी भूमिका शरद पवार गट आणि काँग्रेसने घेतलेली आहे.

Tejas B Shelar
Published:
Mahavikas Aaghadi CM Candidate

Mahavikas Aaghadi CM Candidate : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आहे. यामुळे महाविकास आघाडी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी सुरू आहे.

मात्र अद्याप महाविकास आघाडीने आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल या संदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या ठाकरे गटाने वारंवार आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी लावून धरली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचे अनेकदा म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी ठाकरे गटापेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घ्यायचा अशी भूमिका शरद पवार गट आणि काँग्रेसने घेतलेली आहे.

पण, यामुळे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदावरून राजकारण रंगतांना दिसतय. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मुख्यमंत्री होणारच असं वक्तव्य केले आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून मोठ वादळ तयार होणार अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. खरे तर नाना पटोले यांनी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना उत्तर देताना मी मुख्यमंत्री होणारच असे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नाना पटोले काय म्हणतात?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नुकतेच नाना पटोले हे भावी आहेत आणि भावीच राहणार असं वक्तव्य करत नाना पटोले यांना डिवचलं होत. आता प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी देखील पलटवार केला आहे.

नाना पटोले यांनी, ‘भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या लोकांना प्रफुल पटेल यांच्याकडून फार काही अपेक्षा उरलेल्या नाहीत. पटेल यांना खऱ्या अर्थाने या जिल्ह्यावर प्रेम असतं, त्यांची भूमिका विकासाची असती, तर त्यांनी मला आशीर्वाद दिला असता. पण, त्यांनी आता भावी आहे आणि भावीचं राहणार असे म्हटले आहे.’

तसेच पटोले यांनी पुढे बोलतांना, प्रफुल पटेल यांनी माझ्या विरोधात जे काही षडयंत्र तयार केलेलं होतं, त्या षडयंत्राला मागे टाकत मी कायम पुढे गेलो आहे. ते मला आमदार होऊ देत नव्हते, पण मी आमदार झालो. खासदार होऊ देत नव्हते, पण मी खासदार झालो. एवढेच काय तर मी विधानसभा अध्यक्ष सुध्दा झालो आणि आता मी मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच असे विधान केले आहे.

यासोबतच नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल, तोचं मला मान्य असेल असे देखील स्पष्ट केले आहे. एकंदरीत पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आपल्या वक्तव्यातून स्पष्ट संकेत दिले आहेत. हायकमांडने आदेश दिल्यास आपण मुख्यमंत्री होऊ हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादळ येऊ शकते असेही म्हटले जात आहे. यामुळे पटोले यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या घटक पक्षांच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया समोर येते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe