अकोले तालुक्यात मोठा राजकीय भूकंप; माजी मंत्री मधुकर पिचड स्वगृही परतणार? भांगरेंचे भवितव्य अधांतरी.. !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics : ऐन विधानसभेच्या तोंडावर अकोले तालुक्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण अकोले तालुक्यातील माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड हे दोघेही राष्ट्रवादीत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीत चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र या राजकीय भूकंपामुळे अमित भांगरे यांचे राजकीय भवितव्य मात्र अधांतरी लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची झोप उडाली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेचा विचार करता पुरोगामी विचाराच्या अकोले तालुक्यातून शिर्डी मतदार संघातून महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत . यात मुख्य म्हणजे त्यांना अकोले तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळालेले आहे. तसेही अकोले तालुका हा शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो.

त्यामुळे याच कारणामुळे माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड यांनी जर राष्ट्रवादीत शरद पवार गटात प्रवेश केला तर आगामी विधानसभेत पिचड घराण्याला फायदा होऊ शकतो. एकंदरीत लोकसभेचा विचार करता या तालुक्यातून महाविकास आघाडीला विधानसभेत यश येऊ शकते.

दूध उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी, मणिपूर घटनेमुळे नाराज असलेला आदीवासी बांधव तसेच शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग तसेच स्वतः माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना मानणारा वर्ग या सर्व घटक पाहता आगामी विधानसभेत यशाचा मार्ग महाविकास आघाडीला व माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड यांना दिसत असावा. त्यामुळेच पिचड यांच्याकडून तसे प्रयत्न केले जात आहेत.

मात्र दुसरीकडे माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड यांना राष्ट्रीवादीत प्रवेश दिला तर राष्ट्रीवादीच्या शरद पवार गटाचे भावी उमेदवार म्हणून समजले जाणारे अमित भांगरे हे पक्षात थांबतील का? याबाबत देखील प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान १९ तारखेला शरद पवार हे अकोले शहरात येणार आहेत . यामुळे अमित भांगरे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. परंतु या समजलेल्या बातमीमुळे अमित भांगरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची झोप उडाली आहे.

तर दुसरीकडे महायुतीत उमेदवारीसाठी दोन स्पर्धक असल्याने जात आमदार वैभव पिचड भाजपातून बाहेर पडून राष्ट्रीवादीत प्रवेश केला तर अजित पवार गटाचे किरण लहामटे यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान जर माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रीवादीत प्रवेश केला तर त्यांचे स्वागत करू असे खासगीत बोलत आहेत. त्यामुळे आगामी काळात अकोले तालुक्यात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe