भविष्य घडविण्यासाठी निर्णय घ्या ! ठाकरे गटाच्या नेत्याला भाजप प्रवेशाचे निमंत्रण, मंत्री विखे पाटील पुन्हा धमाका करणार?

Published on -

Politics News : अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावत असते. सध्या जिल्ह्याचा विचार केला तर उत्तर व दक्षिणेत दोन्ही ठिकाणी विखे घराण्याचे वर्चस्व दिसते.

तसेच यावेळी सर्व विखे विरोधक एकत्र दिले असल्याचेही चित्र आहे. आता विखे पाटील अहमदनगरच्या राजकारणात बेरजेचे राजकारण खेळताना दिसत आहेत. त्यांनी दक्षिणेत जसे जगताप-कर्डीले सोबत घेतले तसे उत्तरेत आता अनेकांना सोबत घेण्याचीच तयारी सुरु केलीये.

त्यांनी नुकतेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर यांना अप्रत्यक्षपणे भाजपसोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला आहे. यावेळी मंत्री विखे यांनी राजकीय फटकेबाजी केली.

काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तुमच्या तालुक्याला चांगल्या फलंदाजाची गरज असून समोरून कसाही बॉल आला, तरी टोलावता आला पाहिजे तुम्ही फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोडा असे म्हटले आहे. तसेच यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर यांना आता एकच संघ निश्चित करा.

तुम्ही आयपीएल सारखे संघ बदलू नका. आपले भविष्य घडविण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले आहेत. यातून एकप्रकारे भाजपात प्रवेश करण्याचे निमंत्रणच त्यांनी दिले असल्याची चर्चा रंगली होती.

आ. थोरातांवरही अप्रत्यक्ष फटकेबाजी

क्रिकेट स्पर्धेचे औचित्य पाहून विखे पाटील यांनी क्रिकेटच्या भाषेतच राजकीय फलंदाजी केली व तशीच फटकेबाजी केली. ते म्हणाले की, या स्पर्धेतून चांगले फलंदाज गोलंदाज मिळाले आहेत तसे या तालुक्याला चांगल्या फलंदाजांची आवश्यकता आता आहे.

समोरून कितीही आणि कसेही बॉल आले तरी टोलावता आले पाहिजे बाकी फिल्डींगचे काम माझ्यावर सोडा असे म्हणत आ. थोरातांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe