Mallikarjun Kharge : देशाचे प्रश्न राहिले बाजूला संसदेत मफलरचीच रंगली चर्चा, खर्गे यांच्या मफलरच्या किमतीवरून रंगले राजकारण

Ahmednagarlive24 office
Published:

Mallikarjun Kharge : सध्या अदानींच्या मुद्यावर विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही केंद्र सरकारला याप्रकरणी धारेवर धरले. यामुळे संसदेत मोठा गोंधळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना जोरदार उत्तर दिले.

खर्गे केंद्र सरकारवर तुटून पडलेले असतानाच सत्ताधाऱ्यांच्या नजरा त्यांच्या गळ्यातील मफलरवर गेल्या. सोशल मीडियावर त्यांच्या मफलरने कमाल केली. त्यांचे मफलर अचानक व्हायरल झाले. दोन दिवसांपासून खर्गे यांचे मफलर चर्चेत आले. या चर्चेमागे या मफलरची कंपनी आणि या मफलरची किंमत हे कारण होते.

सोशल मीडियावर या मफलरच्या किंमतींची जोरदार चर्चा सुरु झाली. खर्गे यांच्या गळ्याची शोभा वाढविणारे मफलर लुई वीटॉन या कंपनीचे आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर या मफलरची किंमत जवळपास 56332 रुपये आहे. यामुळे भाजपवाल्यांना आयती संधी मिळाली.

भाजपने सोशल मीडियावर खर्गे यांच्या महागड्या मफलरवर प्रश्न विचारला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी तर इतके महागडे मफलर खरेदी करण्यासाठी खर्गे यांच्याकडे पैसा आला कोठून अशा प्रकारचा प्रश्न केला आहे.

दरम्यान, याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मफलरची चर्चा होयची, तसेच यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूटवर जोरदार टीका झाली होती. हा सूट 10 लाख रुपयांचा असल्याने मोठा गोंधळ उडाला होता. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या टी शर्टची देखील मोठी किंमत असल्याचे सांगितले गेले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe