राज्यात आम्ही महायुती म्हणून आम्ही काम करतो.ज्या पक्षाकडून चुका होतात त्यांनी त्या दुरूस्त केल्या पाहीजेत.महायुतीवर या गोष्टीचा परीणाम होतो.राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे.त्याचा आदर केला पाहीजे चुकीच्या पध्दतीने वागणार्या कार्यकर्त्यांना अटकाव केला पाहीजे असे मत जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रसारीत झालेल्या व्हीडीओ बाबत त्यांनी स्वताच खुलासा केला आहे.मात्र लगेच निष्कर्श काढून त्यांना दोषी ठरवणे योग्य नाही.विधीमंडळातील व्हीडीओ काढून त्यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

मंत्री विखे पाटील म्हणाले की,कोणी काय करावे हे कोण ठरवणार हे शुटींग नेमके कोणी केले.सभागृह चालू असताना अनेकजण मोबाईलवर बातम्या किंवा कामकाजाची माहीती घेत असताना असे व्हीडीओ आले तर काय करणार याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या घटनेबाबत त्यांनी स्वताच खुलासा केला आहे.आशा घटनेचे कोणीही समर्थन करणार नाही.सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला असून नेत्यांसमोर प्रामाणिकपणा दाखविण्यच्या नादात अति उत्साही कार्यकर्ते असे उद्योग करतात.परंतू यामुळे पक्षाचे नेते आणि पक्षाची अडचण विचारात घेतली जात नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
नासिक येथील हॅनी ट्रॅप बाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सर्व स्पष्टता केली आहे. असे प्रकार होणे भूषणावह नाही.चौकशी यंत्रणाचे काम सुरू आहे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट करताना भडकपणे बोलण्यापेक्षा लोढा नामक व्यक्तीने एकदाचे बटन दाबून टाकावे आशी मिश्कील टिपणी केली.