Maratha Reservation : छगन भुजबळांना ओबीसींचा उठाव करण्याची गरज नव्हती.. मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य, पहा..

Tejas B Shelar
Published:

Maratha Reservation : आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात तीव्र होत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सध्या महाराष्ट्राभर सभा घेण्याचा तडाखा लावला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करत आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथे एल्गार सभा देखील घेतली होती. यात विविध नेत्यांनी एल्गार केला. मराठा आरक्षणास ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील घणाघात केला.

यातच आता भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकाच केली आहे. ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती, असे मंत्री विखे यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले मंत्री विखे

मराठा आरक्षणाची धार वाढत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जी आरक्षणविषयी मागणी केलीये त्या मागणीला सरकारची संमती आहे. परंतु जर शासनाने दोन जानेवारीपर्यंत मुदत घेतली, वेळ मागितला आहे तर जरांगे पाटील यांनीही संयम ठेवायला हवा.

त्यांनी सरकारला वेळ दिला आहे त्यामुळे शासन योग्य निर्णय घेईलच. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांनी जो ओबीसींचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती असं मला वाटत. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती,

तर हा उठाव करणं एकदम योग्य होत पण जर कुणी आरक्षण मागत असेल म्हणून त्याला विरोध करणं व करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभे करणे हे योग्य नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe