मंत्र्यांना राज्यात फिरताही येणार नाही, मला फक्त लोकसभेत खासदारकीची शपथ घेऊ द्या, त्यानंतर…खा.लंके यांचे मोठे वक्तव्य

तुम्ही सर्वांनी निवडणूक हातात घेऊन प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे माझा विजय झाला. जनतेने निवडणूक हातात घेतली होती, अन् मला थेट दिल्लीला पाठविले. मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना तुमच्याकडे पुढील वेळेस येताना जिल्ह्यातील १२ आमदार घेऊन येईन, असा शब्द देवून आलोय. मी हंगा सारख्या छोट्या गावचा सरपंच होतो, १० वर्षांनी थेट आमदार झालो, तद्नंतर आज खासदार झालो, मी अपराजित योध्दा आहे.

Published on -

Ahmednagar Politics : शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला कांदा व दूध यांची भाववाढ होण्यासाठी मोठे आंदोलन उभे करणार असून त्यामुळे राज्यातील मंत्र्यांना राज्यात फिरता येणार नाही, त्यासाठी मला फक्त लोकसभेत खासदारकीची शपथ घेऊ द्या, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार डॉ. निलेश लंके यांनी केले.

खा. लंके यांचे निघोज बसस्थानक परिसरात आगमन होताच, फटाक्यांची आतषबाजी, डीजेचा दणदणाट व तुतारी च्या निणादात स्वागत करण्यात आले. त्यांनी प्रथम श्री मळगंगा मातेचे दर्शन घेतले, तनंतर निघोजमधील विविध आस्थपनांचे उद्घाटन केल्यानंतर कपिलेश्वर मंगल कार्यालयात निघोज ग्रामस्थ वविविध संस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत होते.

प्रास्ताविकात पारनेर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच ठकाराम लंके म्हणाले की, खा. नीलेश लंके यांना निघोज जिल्हा परिषद गटाने मोठे मताधिक्य दिले. त्यासाठी येथील जनतेचे मोठे योगदान आहे. झालेली ही निवडणूक धनाढ्‌या विरुद्ध गरिबाची होती. खा. लंके पुढे म्हणाले की, मला खासदारकीची शपथ घेईपर्यंत काही बंधने आहेत.

मी श्री मळगंगा मातेचा निस्सीम भक्त असल्याने माझे व निघोजकरांचे वेगळेच नाते आहे. त्यांनी मला गावातून व गणातून मोठे मताधिक्य दिले, त्यामुळे निघोज गाव व गणाचा माझ्या विजयात मोठा वाटा आहे तसेच अळकुटी व त्या गणातील १३ गावांनीही मला मोठे मताधिक्य दिले आहे. माझ्या आमदारकीच्या साडेचार वर्षाच्या कार्य काळात मी पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात विकास कामांसाठी निधी दिला असून,

यापुढेही निधी दिला जाईल. तुम्ही सर्वांनी निवडणूक हातात घेऊन प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे माझा विजय झाला. जनतेने निवडणूक हातात घेतली होती, अन् मला थेट दिल्लीला पाठविले. मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना तुमच्याकडे पुढील वेळेस येताना जिल्ह्यातील १२ आमदार घेऊन येईन, असा शब्द देवून आलोय. मी हंगा सारख्या छोट्या गावचा सरपंच होतो, १० वर्षांनी थेट आमदार झालो,

तद्नंतर आज खासदार झालो, मी अपराजित योध्दा आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही, की मी खासदार झालो, पण राज्यातील सर्वच मतदासंघात माझे विजयी फलक लागले आहेत. एवढे प्रेम जनता माझ्यावर करते, हे कोणाच्याही नशिबात नसते. आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेरची जागा एक लाख मताधिक्याने जिंकू. लोकं मला भेटायला येतात, विकास कामे मागतात, पण थोडे थांबा, मला खासदारकीची शपथ घेऊ द्या, माहिती होऊ द्या, असे लंके म्हणाले.

या वेळी अशोक सावंत, पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, खंडू भुकन, माजी सदस्य डॉ. भास्करराव शिरोळे, ग्रा.पं. सदस्या सुधामती कवाद, पांडुरंग कृपा पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत लंके, युवानेते रुपेश ढवण, शिवसेना नेते बाबाजी तनपुरे, माजी सरपंच शिवाजी औटी, स्वाती नहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माहिती विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे,

उपसभापती बापू शिर्के यांनी मनोगत व्यक्त केले. व्हा. चेअरमन नामदेव थोरात, उद्योजक अमृता रसाळ, माजी चेअरमन रामदास वरखडे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलराव शेटे, मळगंगा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विठ्ठलराव कवाद, माजी सरपंच संतोष काटे, युवानेते अनिलराव आवारी, विश्वस्त बाळासाहेब लंके, विश्वास शेटे, विकास शेटे, सरपंच दत्ता म्हस्के, सदस्य शंकरराव गुंड, पप्पू मते,

दिलीप ढवण, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर, कविता लंके, पुष्पा वराळ, आदी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नगर जिल्हा सचिवपदी दै. पुण्यनगरीचे सुरेश खोसे पाटील व अध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या निवडीनिमित्त खा. लंके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे यांनी सूत्रसंचालन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe