Nana Patole : नाना पटोले एकमेव नेते, जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करतात, राष्ट्रवादीचा थेट आरोप

Published on -

Nana Patole : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे मविआमधील एकमेव नेते आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. आज सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे नेते देखील नाना पटोले यांच्यावर टीका करत आहेत.

आज नवनियुक्त आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. काँग्रेसवर निशाणा साधत त्यांनी प्रदेश काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पक्षाकडून चुकीचा एबी फॉर्म पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या बदनामीचे षडयंत्र रचले गेले. असेही ते म्हणाले. त्यांनी नाना पटोले यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. यामुळे आता नाना पटोले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता नाना पटोले काय उत्तर देणार हे बघणे महत्वाच ठरणार आहे. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्यजित तांबे यांनी सध्या आपण अपक्षच राहणार असल्याचे सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe