Nana Patole : गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना आज जागावाटप देखील झाल्याचे म्हटले जात होते. यावर मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दल नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भातील कोणतीही बैठक झाली नसल्याचे ते म्हणाले..

ते म्हणाले, ही अफवा असल्याचे नाना पटोले यांनी सांगत मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी काहीही करो, काहीच हाती लागणार नाही. असेही ते म्हणाले. यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करणार असल्याचे दिसून येत आहे.
कोणी किती आणि कसंही वातावरण तयार केले तरी महाराष्ट्रात त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागेल, असे चित्र निर्माण झाल्याचे नाना पटोले यांनी सांगत विरोधकांना खोचक टोलाही लगावला आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होणार आहेत. या सभेसाठी बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच याबाबतची जबाबदारी बड्या नेत्यांवर देण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.