‘नरेंद्र मोदी राष्ट्रपती, पंतप्रधान पदावर अमित शहा येतील, तर योगी आदित्यनाथ यांच्याकडे गृहखाते’

Ahmednagarlive24 office
Published:

India News : देशातील राजकारण सध्या वेगात फिरू लागले आहे. आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आल्याने विविध गणितांची जुळवाजुळव सुरु आहे. भाजप सध्या मोठा पक्ष असून भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कम्बर कशी आहे.

दरम्यान २०२४ ला भाजपचं सत्तेत येईल. यावेळी प्रथम नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण मध्येच ते पद सोडलातील. त्यानंतर ते राष्ट्रपती होतील. नरेंद्र मोदी यांच्या जागी अमित शाह पंतप्रधानपदावर विराजमान होतील तर गृहमंत्रीपदाची सूत्रे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वीकारतील, असा मोठा दावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे.

केंद्राने जे शेतकरी कायदे आणले त्या विरोधात मोठे आंदोलन उभे करून ते यशस्वी करून दाखवणाऱ्या राकेश टिकैत यांनी केलेल्या भाकितानंतर चर्चाना उधाण आले आहे. सध्या मोदी यांच्या नंतर योगी आदित्यनाथ हे भारताचे पंतप्रधान असतील असं म्हटलं जात. परंतु राकेश टिकैत यांनी वेगळेच भाकित वर्तवले असल्याने राजकीय चर्चा पुन्हा रंगल्या आहेत.

सपा आमदार अतुल प्रधान हे सध्या उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राकेश टिकैत मेरठमध्ये आले असताना त्यांनी ही राजकीय भाकिते केली. देशात सत्ता भाजपचीच येईल. पण पंतप्रधानपदी नवा चेहरा दिसेल असे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे नेमकं वर्तवलेलं भाकीत

२०२४ च्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक भाजपच जिंकेल व त्यानंतर सुरुवातीला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील. पण मध्येच ते पद सोडून राष्ट्रपतीपदी विराजमान होईल व त्यानंतर अमित शाह पंतप्रधानपदाचे सूत्र हाती घेतील.गृहमंत्रीपदाची सूत्रे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वीकारतील, असा मोठा दावा राकेश टिकैत यांनी केला आहे.

२०२४ साठी मोठी तयारी

आगामी लोकसभा २०२४ मध्ये होणार आहेत. या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. तिसऱ्यांदा सत्तेत यायचे असल्याने पक्षाने कंबर कसली आहे. विविध राज्यात काही पक्षांना सोबत घेत तर काही ठिकाणी पक्षातील बंडखोरांना सोबत घेत पुढील लोकसभेची आखणी सुरु केली आहे. त्यामुळे आता लवकरच सर्वपक्षीय नेते लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe