Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार कर्नाटकात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बिदर गुलबर्गा बेळगाव व इतर ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत. तत्पूर्वी त्याची चाचपणी केली जात आहे. त्यात बसव कल्याण व औराद विधानसभा मतदारसंघात पक्षाला विजयाची खात्री आहे.
याबाबत पक्षाचे राज्य सचिव रामभाऊ जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यामुळे आता या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, प्रत्येक ठिकाणी चांगला उमेदवार देण्याचा विचार आहे. त्याबाबत पक्षाने तयारी सुरू केल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव जिल्ह्यात सात अर्ज दाखल झाले आहेत. याठिकाणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या देखील सभा होण्याची शक्यता आहे. सध्या गुजरात, झारखंड आणि मेघालय येथे प्रत्येकी एक आमदार तर केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत.
तसेच सध्या राष्ट्रवादीचे लक्षद्विपमधून एक खासदार निवडून आला आहे. असे असताना आता कर्नाटकमध्ये राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे त्यांना कसे यश मिळते, हे लवकरच समजेल. यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार तयारी करत आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे अमोल देसाई, दुर्गेश मेत्री, शाम मांतेरो, मुनीर लतिफ, ज्योतिबा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीमध्ये इतर पक्ष देखील त्यांना साथ देण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.