Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा जागेला अनन्यसाधारण महत्व आले आहे. भाजपचे उमेदवार खा. सुजय विखेंविरोधात कोण लढणार याचीच चर्चा सुरु आहे. विशेषतः राष्ट्रवादीबाबत जास्त चर्चा आहे.
याचे कारण म्हणजे ही जागा राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) कडे आहे. त्यामुळे मध्यंतरी समोर असणारे आ. लंके यांचे नाव मागे पडले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून कोण उभे राहणार याबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.

परंतु आता दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) कोण उमेदवार असणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मात्र मोठं स्पष्टीकरण एका माध्यमाशी बोलताना दिल आहे. त्यांनी राजकीय गणितच समोर मांडले आहे.
ते म्हणाले की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार कुटुंबातीलच उमेदवार असणार हे निश्चित आहे. शरद पवार गटाकडून आमदार नीलेश लंके यांचे नाव घेण्याचे कारण आता उरलेले नाही, कारण ते अजित पवार गटात आहेत असही त्यांनी सांगून टाकलं आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार अर्थात राष्ट्रवादीनेच लढवलेला आहे. त्यामुळे 2024 मध्ये देखील लोकसभेची नगर दक्षिणची जागा त्यांच्याकडेच असणार आहे. व तेथील उमेदवार शरद पवारच निश्चित करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले.
* फाळकेंकडून रोहित पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब
आगामी लोकसभेसाठी शरद पवार कुटुंबातील उमेदवार असेल. म्हणजेच एक प्रकारे आमदार रोहित पवारच मैदानात असतील याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. ते सध्या नाही म्हणत आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु नगर दक्षिणसाठी शरद पवार अगदी पहिल्यापासून लक्ष ठेऊन आहेत हे रोहित पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याच्या नजरेतून सुटलेले नसलेच. त्यामुळे रोहित पवार हे शरद पवार यांच्यासाठी नक्कीच मैदानात उतरतील, म्हजेच ते आगामी उमेदवार असतील असे ते म्हणाले.
* आ. बाळासाहेब थोरातांवरही भाष्य
नगर दक्षिणबाबत राष्ट्रवादी (शरद पवार गट) परस्पर निर्णय घेऊ शकत नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्याचे कारण असे की, राज्यात आणि देशात महाविकास आघाडी असल्याने जागांबाबत निर्णय बैठकीत बसून होतील असं त्यांनी म्हटलं होत.
या वक्तव्यामुळे शरद पवार यांच्या चाचपणीसाठी झालेल्या बैठकांची हवाच निघून गेली होती. यावर फाळके यांनी भाष्य करत म्हटलं आहे की, नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी आजवर लढली आहे व त्यासाठी शरद पवार किती आग्रही असतात हे सर्वांनाच माहिती आहे.
महाविकास आघाडी असली तरी सर्व घटक पक्षांना या जागेबाबत शरद पवारांची भूमिका काय असेल हे माहीत असल्याने विरोध होण्याचे कारण नाही असं म्हटलं आहे.