नदीजोड प्रकल्पातील कामासाठी आवश्यक परवानग्या लवकर मिळवाव्यात-ना.विखे पाटील

Tejas B Shelar
Published:

नदीजोड प्रकल्पांची कामे विहित वेळेत सुरू होण्यासाठी या कामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण, वन विभागासह अन्य आवश्यक परवानग्या जलसंपदा विभागाने लवकरात लवकर मिळवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणेबाबतचा आढावा जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या या बैठकीत घेतला.

बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता तथा सहसचिव अभय पाठक, प्रसाद नार्वेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले,राज्यातील आवर्षण प्रवण भागाला सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाची कामे लांबल्याने लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व प्रकल्पाचा खर्चही वाढतो.

त्यामुळे या प्रकल्पांची कामे विहित मुदतीत सुरू होणे आवश्यक असल्याने आवश्यक प्रक्रिया विभागाने सुरू करावी. या कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. आराखड्यानुसार कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe