Ahmednagar Politics : साखर वाटपावेळी आमंत्रण नाही, भाजपाकडून महायुतीचा धर्म पाळता जात नाही..विखेंच्या सत्कारावेळीच राष्ट्रवादीकडून खंत

Published on -

सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपा व शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे सरकार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात साखर व डाळ वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा मी जिल्हाध्यक्ष असताना नगर तालुक्यातील माझ्या वाळुंज गावात साखर व डाळ वाटपाचे अधिकृत निमंत्रण मला देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचा धर्म पाळता जात नसल्याची खंत जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी खासदार सुजय विखे पाटील यांच्या समोरच व्यक्त करून दाखवली.

मंगळवारी (दि. १६ जानेवारी) खासदार सुजय विखे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व गावांना गोरगरीब जनतेला मोफत साखर वाटपाचा कार्यक्रमानिमित्त वाळुंज येथे आले असता त्यांचा सत्कार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी भाषणात वाळुंज गावात मी स्वतः राहतो व आमची छोटीशी शेती इथे आहे.

तसेच महायुती असली तरी कार्यक्रमाचा निरोप, तसेच माझ्या स्वतःच्या गावात आपण येताय याची माहिती नव्हती. त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी जाहीर खंत व्यक्त केली. तसेच खासदारांच्या स्वागताला उपस्थित नव्हतो याबाबत देखील दिलगिरी त्यांनी व्यक्त केली. तसेच स्वतः वाळुंज गावातील एक ग्रामस्थ म्हणून जिल्हाध्यक्षांनी ग्रामस्थांच्या वतीने खा.विखेंकडे मागणी केली की, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वाळुंज फाटा ते वाळुंज गाव खडीकरण व डांबरीकरण आपल्या खासदार निधीतून मंजूर करावं अशी विनंती केली.

यावेळी इतर मान्यवरांचेही त्यांनी स्वागत केले व आभार मानले. त्याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रताप पाचपुते, नगर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News