शरद पवारांशी कोणतीही भेट झाली नाही; एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो जुना असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

माझी आणि शरद पवारांची नुकतीच कोणतीही भेट झालेली नाही. प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेला फोटो जुन्या भेटीचे आहेत, असेही स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिले आहे. एकनाथ शिंदेंनी याबाबत ट्वीट करत व्हायरल झालेल्या फोटोबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत भेटीबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe