कोणताही सामाजिक वाद महाराष्ट्रामध्ये होऊ नये : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

Published on -

१७ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या रकमा त्यासुद्धा लाभार्थ्यांना मिळत नाही. ज्यावेळी निराधारांच्या रकमा पोहोचत नाही, त्यावेळी राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. हे वेगळे सांगण्याचे आणखी काही दंडक असू शकत नाही. अशी टीका काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

रविवारी (दि.१६) माजी मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला,त्यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली.काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता थोरात म्हणाले,राजकारणाचा व समाजकारणाचा मोठा अभ्यास असलेले हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व आहे.

त्यांच्या संघटन कौशल्यावर काँग्रेस श्रेष्ठींचा विश्वास आहे.त्यांची कारकीर्द अनेक अर्थाने यशस्वी राहील.दिल्लीतील श्रेष्ठींनी आमच्या सर्व वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली होती.नवीन अध्यक्ष करताना नवा वयोगटातील करावा.नवीन युथ जोडण्याकरिता अशा व्यक्तिमत्त्वाची गरज आहे.असे आमचे एकमत होते,असे ते पुढे म्हणाले.

धस यांनी मुंडे यांच्यावर टीका केली आणि तेच त्यांची भेट घेत आहेत,असे विचारले असता माजी मंत्री थोरात म्हणाले, राजकारणात काही गोष्टी व्यक्तिगत स्वरूपाच्या असतात.कोणताही सामाजिक वाद महाराष्ट्रामध्ये होऊ नये.मी स्वतः देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटून आलो. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निघृणपणे झाली आहे.

यामध्ये दोषी जो असेल, त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. गुंडगिरीचे वातावरण वाढते, असे म्हटले जाते. त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री किंवा शासनाची आहे. त्यांनी त्यामध्ये कुणाचाही मुलाहिजा करू नये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe