Maharashtra News : पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे कामे चांगल्या दर्जाचे झाली पाहिजे. ठेकेदारांनी या योजनेतील रस्त्याची कामे चांगली करावी, असे आवाहन खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.
तालुक्यातील कवठे मलकापूर, गुंजाळवाडी, मालदाड व चिचोली गुरव या चार ठिकाणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सुमारे ३२ कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे भूमिपूजन काल बुधवारी खा. सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त गुंजाळवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/11/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-11-09T092005.553.jpg)
यावेळी खा. लोखंडे म्हणाले, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना सुरू केली. या योजनेस २५ वर्ष पूर्ण होत आहे. संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली अनेक रस्ते आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्याचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची व्हावी. या योजनेचे जनक माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या ग्रामीण भागातील रस्ते विकास धोरणाला साजेसे होईल, असे काम ठेकेदारांनी करावे, अशी सक्त ताकीद खा. लोखंडे यांनी दिली
शिर्डी मतदारसंघात येणाऱ्या १८२ गावांना तब्बल ५० वर्षानंतर निळवंडे धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी आपण खासदारकी पणाला लावली आहे. दुष्काळी भागातील जनतेला २०२३ मध्ये पाणी मिळून दिले आहे.
यासाठी आता येथून पुढची लढाई आपल्या सर्वांना घाटमाथ्याच्या पाण्याच्या संदर्भात लढवावी लागेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
तर मराठवाड्याला एक थेंबही पाणी देणार नाही
जर घाटमाथ्याचे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यासाठी लवकरात लवकर प्रकल्प हाती घेतला नाही, तर आम्ही एक थेंबही पाणी मराठवाड्याला देणार नाही, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ राहणे, राष्ट्रवादीचे कपिल पवार, एस. आर. थोरात दूध उद्योग समूहाचे संचालक पृथ्वीराज थोरात, नामदेव गुंजाळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे,
राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, अमोल गुंजाळ, श्याम राहणे, अंकुश राहणे, सुयोग गुंजाळ, महेश जगताप, सोमनाथ गोडसे, उत्तम नवले, लहानु नवले, माधव गिरी, बाळासाहेब राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.