Ahmednagar News : सध्या अहमदनगर मधील राजकारण चांगलेच तापले आहेत. राजकीय आरोपांनी सगळी दिवाळीफराळे गाजली. या आरोपांना काही पक्षीय बंधने आहेत असेही नाही. विरोधक एकत्र येतायेत आणि स्वपक्षियांवर टीका करतायेत अशी सध्याची स्थिती आहे.
सध्या शहरात भाजप खा. सुजय विखे, भाजप माजी आमदार कर्डीले व राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप हे एका बाजूने व बाकी सगळे दुसऱ्या बाजूने असे सध्याचे चित्र दिसत आहे. नुकताच नुकतेच खा. डॉ. सुजय विखे यांनी सीना नदीवरील पुलाचे उदघाटन केले.
या वेळी त्यांनी सर्वच विरोधकांचा समाचार घेतला. यात त्यांनी नगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावरदेखील तिकस्तर सोडले होते. परंतु यानंतर काळे यांनी अनेक गौप्यस्फोट केले ज्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले.
* ‘पंतप्रधान कार्यालयाकडून विखे पिता-पुत्रांची कानउघडणी’
खा. विखेंवर किरण काळे यांनी टीकास्त्र सोडले. सत्ता एखाद्याच्या डोक्यात गेल्यावर जनता घरी बसवते असा इतिहास आहे. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून विखे पिता-पुत्रांची कानउघडणी झाली असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ते म्हणाले,
जिल्हा आयुष रुग्णालयाची शहर काँग्रेसने पोलखोल केली, तेथे अनेक विभाग बंदच आहेत. त्यानंतर विखे पिता-पुत्रांची थेट दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली असल्याचे ते म्हणाले.
आणि आता ते दोघे पंतप्रधानांची लागेल त्या पातळीवर जात स्तुती करून आपले पितळ झाकण्याचा प्रयत्न करतायेत असे ते म्हणाले. त्यानंतर राजकीय चर्चा रंगू लागल्या. पंतप्रधान कार्यालयाकडून विखे पिता-पुत्रांची कानउघडणी खरोखर झाली का अशी चर्चा रंगली आहे.
* ‘बोकड खाऊ घातल्याने मोठा होत नाही
‘ विखे यांच्या अभीष्टचिंतनच्या कार्यक्रमावरून देखील त्यांनी घणाघात केला. खा. विखे यांनी आधी नगर शहरात झालेल्या फराळ कार्यक्रमांवर टीका केली. दिवाळी फराळातून जर माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक आमदार एक ‘हलवाई’ असता,
असे ते म्हणाले होते. तसेच त्यांनी जेवढे लोक दहा फराळात होते, ते माझे तिखट खायलासुद्धा येणार. यावर काळे यांनी घणाघात केला. ते म्हणाले, खासदारांचा गैरसमज झालाय, लोक त्यांच्या तिखटावाचून उपाशी आहेत.
म्हणूनच शंभर बोकडांपैकी पन्नास-साठ बोकडाचं मटण फेकून द्यायची त्यांच्यावर वेळ आलेली आहे. महत्वाचे म्हणजे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला फाटा दिला, माणूस बोकड खाऊ घातल्याने मोठा होत नाही. तर जनतेची सेवा, विकासकामे केल्याने मोठा होत असतो असा घणाघात केला.
* दहशत करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून खासदार बसले
किरण काळे यांनी खा. विखे यांच्या मागील प्रचारातील एका वक्तव्याची आठवण करून देत म्हणाले की तुम्ही म्हणाले होते, नगर शहरातील दहशत संपवण्यासाठी मला खासदार करा. त्यावेळी तुमचा रोख कोणाकडे होता व तुमचा विरोधक कोण होता हे सर्वाना माहित आहे. परंतु आता तुम्ही दहशत करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून बसला आहात. तुम्ही मतदारांना फसवले आहे असे ते म्हणाले.