अहमदनगर : साखर वाटप हा एक सामाजिक उपक्रम असून, विरोधक मात्र आमच्या साखरेचे राजकारण करत आहेत. विरोधकांना आमची साखर न खाताच ती कडू लागत आहे. असा मिश्किल टोलादे खा. सुजय विखे यांनी लगावला.
ग्रामीण भाागात ग्रामस्थांना साखर वाटपाचा कार्यक्रम व विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. विखे होते.

ते म्हणाले की, मागील नऊ वर्षांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत राहिलेल्या केंद्र सरकारने पारदर्शक कारभार करून भ्रष्टाचारमुक्त देश, असा संदेश संपूर्ण जगाला दिल्यामुळेच खऱ्या अर्थाने देश मेट्रो सारख्या प्रभावी योजना राबवून जगामध्ये एक बलशाली देश म्हणून नावारुपाला आला आहे.
यापूर्वी काँग्रेस सरकारच्या कार्य काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला होत.त्यामुळे देश अधोगतीच्या मार्गाने वाटचाल करत होता. परंतु या देशातील सुज्ञ नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम पंतप्रधान या देशाला देऊन भ्रष्टाचारमुक्त असा कारभार नऊ वर्षाच्या कार्य काळामध्ये केल्यामुळेच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती झाली आहे. देशाच्या प्रगतीमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची देखील हिम्मत आता कोणाची राहिली नाही.असे म्हणाले.