चूका करणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा, नाहीतर पक्ष अन् नेता दोघंही अडचणीत येतात- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published on -

शिर्डी- “राज्यात महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करत आहोत. कोणत्याही पक्षाकडून चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त केली पाहिजे. कारण अशा चुका संपूर्ण महायुतीवर परिणाम घडवतात. राज्यातील जनतेने दिलेला जनादेश ही आपली जबाबदारी आहे आणि त्याचा सन्मान करणं अत्यावश्यक आहे, चुका करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा,” असे स्पष्ट मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडीओ प्रकरणाबाबत विखे पाटील म्हणाले, “कोकाटे यांनी स्वतः पुढे येऊन खुलासा दिलेला आहे. त्यामुळे लगेच निष्कर्ष काढून त्यांना दोषी ठरवणे योग्य नाही. विधानमंडळातील व्हिडीओ काढून कोणीतरी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर – करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.”

विखे पाटील पुढे म्हणाले, “सभागृह सुरू – असताना अनेक लोक मोबाईलवर बातम्या वाचत – असतात किंवा कामकाजाशी संबंधित माहिती घेत – असतात. अशा वेळी कोणीतरी छुपे शुटिंग करत असेल, तर हे योग्य ठरते का यावर विचार करायला – हवा.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या प्रकाराबाबत -विखे पाटील म्हणाले, “तटकरे यांनी स्वतः यावर खुलासा केला आहे. अशा घटना कोणत्याही पक्षासाठी भूषणावह नाहीत. सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला गेला आहे. नेत्यांसमोर प्रामाणिकपणा दाखवण्याच्या नादात अनेक अति उत्साही कार्यकर्ते असे उद्योग करतात. मात्र, त्यामुळे पक्ष आणि नेतृत्त्व अडचणीत सापडते याचा विचार करणे गरजेचे आहे.”

नाशिक येथील हनी ट्रॅप प्रकरणावरही मंत्री विखे पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले, “मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. अशा घटना राज्याच्या प्रतिमेसाठी योग्य नाहीत. चौकशी यंत्रणा आपले काम करत असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल; मात्र, या प्रकरणावर गरज नसताना आक्रमक बोलण्याऐवजी, लोढा नावाच्या व्यक्तीने एकदाच बटन दाबून मोकळं व्हावं, अशी मिश्कील टिप्पणी करत विखे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!