Ahmednagar Politics : पाचपुते, नागवडे राहीले बाजूला ! आमदारकीला श्रीगोंद्यात ‘हा’ नवा चेहरा भाजप लॉन्च करणार?

Pragati
Published:
fadnvis

Ahmednagar Politics : आगामी विधानसभेला अहमदनगर जिल्ह्यात अनेक मतदार संघात भाजप विविध बदल करेल असे चित्र आहे. त्यात आता श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात देखील भाजप नवा चेहरा लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले आहे.

२०१९ मध्ये बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यात पहिल्यांदा कमळ फुलविले. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. त्यामुळे येथील भाजपचे नेते चांगलेच सतर्क झाले आहेत. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता अगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच दिसेल यात शंका नाही.

परंतु आता श्रीगोंदा विधानसभेसाठी भाजपकडून नवीन नाव चर्चेत आले आहे. कोविड काळात नगर जिल्ह्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजकार्य करणारे राज देशमुख यांच्या नावाची चर्चा प्रदेश पातळीवर झाल्याची माहिती आहे. राज देशमुख हे आर्थिक विश्लेषक असून चांगुलपणाची चळवळीच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात महाराष्ट्रात अग्रेसर असतात.

विविध पक्ष, राजकीय नेते, अधिकारी, खेळाडू आणि कलाकार यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या परिवरिक ट्रस्टचे ते सदस्य देखील आहेत. नितीन गडकरी आणि केंद्रीय नेत्यांशी त्यांचा असणारा थेट संपर्क यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.

मूळचे श्रीगोंद्याचे रहिवासी असलेले देशमुख यांची त्यांच्या समाजकार्यामुळे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात मोठी ओळख निर्माण झालीये. विविध पक्षांमध्ये त्यांचा मित्र परिवार असल्याने त्याचाही फायदा होईल अशी चर्चा आहे. श्रीगोंदा मतदारसंघ हा पाचपुते, नागवडे, जगताप आणि शेलार यांच्या राजकारणात नवखे असे राज देशमुख यांना कितपत साथ देईल हे आता सांगणे कठीण आहे.

प्रस्थापित दिग्गज
श्रीगोंद्याच्या राजकीय पटलावर पाचपुते, नागवडे, जगताप, शेलार हे तुल्यबळ आहेत. राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या राजकारणात स्थानिक पातळीवरील नेत्यांची गोची झाली आहे. उमेदवारी कुणालाही मिळाली तरी स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी तिकीट न मिळणारेही मैदानात दंड थोपटताना दिसतील यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe