Ahmednagar News : ४५ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेला पकडले, कशाला मागत होती पैसे? धक्कादायक माहिती समोर

Pragati
Published:
bribe

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळेतील उपशिक्षिकेच्या वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ४५ हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडण्यात आले. संगीता नंदलाल पवार (क्य ५३, रा. दत्तनगर, पो. टिळक नगर, ता. श्रीरामपूर) असे मुख्याध्यापिकेचे नाव आहे.

वेतनश्रेणीच्या फरकाचे पैसे मंजूर केल्याच्या बदल्यात ५० हजारांची मागणी करून ४५ हजारांची लाच घेताना येथील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. काल बुधवारी (दि. १२) दुपारी चार वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार (वय ५३) यांनी तालुक्यातील शिरसगाव येथील तक्रारदाराला वेतनश्रेणीच्या फरकाचे १ लाख ६३ हजार माझ्याच प्रयत्नाने मंजूर झाले असून त्या बदल्यात ५० हजारांची मागणी करून तडजोडीअंती ४५ हजाराची लाच स्वीकारताना काल बुधवार दुपारी ४ वाजेच्या दरम्यान लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावुन रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाच्या पथकाने येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार (वय ५३) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाच प्रतिबंध विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे,

अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी लोखंडे यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, नागरीकांनी आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी अथवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe