Pimpri : सध्या पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक सुरू आहे. सध्या सर्वच कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आता शड्डू ठोकला आहे. यावेळी ते म्हणाले, काही मान्यवरांनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता हातात घेतली.
दरम्यानच्या काळात माझच चुकलं. मीही पिंपरीचं मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती. ते राहून गेलं. आता ती कसर या निवडणुकीत भरून काढू. स्मार्ट पिंपरी सौदागरचे रोल मॉडेल भविष्यात चिंचवड विधानसभेत राबवू. तेच भोसरी आणि पिंपरीमध्येही राबवायचे.
यासाठी नाना काटे यांच्या रुपाने चिंचवड विधानसभेला लाभणार, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात गलिच्छ, गद्दारीचे राजकारण झाले आहे. त्याला मतांच्या रुपाने उत्तर देण्याची संधी चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली.
यामुळे त्याचे सोन करण्याचे काम करूया, असेही ते म्हणाले. अजित पवार सध्या पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून आहेत. या निवडणुकीच्या निकालावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे गणित अवलंबून आहे.
दरम्यान, थेरगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. तुम्हाला जे काही हवे ते सांगा, मला फक्त यश हवे. तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत, याची जबाबदारी माझी असल्याचे अजित पवार म्हणाले.