Pratibha Pachpute : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असणारा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानात महाराष्ट्रातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असल्याने प्रचार सभांचा झंझावात आणखी तीव्र झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांचाही जोरदार प्रचार सुरु असून त्यांच्या मातोश्री प्रतिभाताई पाचपुते या देखील आपल्या लेकासाठी निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत. खरे तर, आजारपणामुळे बबनदादा निवडणूक लढवणार नसल्याने पक्षाने प्रतिभाताई पाचपुते यांनाच उमेदवारी दिली होती.

मात्र बबनदादांची काळजी घेण्यासाठी प्रतिभाताई पाचपुते यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि आपल्या सुपुत्राला उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी केली. यानुसार पक्षाने सकारात्मक निर्णय घेतला आणि विकीदादांना शेवटच्या क्षणी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देण्यात आली.
आता विकीदादा यांच्या प्रचारासाठी प्रतिभा पाचपुते यादेखील मैदानात उतरल्या आहेत. यासाठी नगर तालुक्यातील गुंडेगाव सह वाळकी गटात प्रतिभा पाचपुते यांनी सभा घेतली आहे. यावेळी प्रतिभाताई पाचपुते यांनी अनेक गावांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना जशी साथ दिली तशीच साथ विक्रमला द्यावी, नगर तालुक्याच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यावेळी श्रीगोंदा मतदार संघात बहुरंगी लढत होत आहे. याच संदर्भात बोलताना प्रतिभा पाचपुते यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात ज्या-ज्या वेळी बहुरंगी लढत झाली त्या-त्या वेळी पाचपुतेच निवडणूक आले आहेत. यंदा होत असलेल्या निवडणुकीमध्येही श्रीगोंदा-नगर मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे.
त्यामुळे विक्रम पाचपुते यांचा विजय पक्का आहे असं सांगत विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही. आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जात आहोत, असे स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना प्रतिभाताईंनी माजी मंत्री बबनराव पाचपुते आमदार, मंत्री राहिलेत. त्यांनी मतदारसंघाचा विकास केलाय.
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक निधी श्रीगोंदा मतदारसंघात आणला आहे. दादांनी विकासाचे व्हिजन घेऊन काम केले आहे. परंतू, विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. केवळ पाचपुते परिवाराकडून होत असलेला मतदारसंघाचा विकास रोखण्यासाठी सध्या ते एकत्र आले आहेत, असं म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.
तसेच, नगर तालुक्यातील गावांचा आम्ही संपूर्ण अभ्यास केलाय. निधी कसा आणायचा? हे विक्रम पाचपुते यांना माहीती आहे. मतदारसंघाची विकासासाकडे वाटचाल सुरु आहे. त्यात खंड पडू देऊ नका, असे म्हणतं प्रतिभा पाचपुते यांनी विकीदादांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन केले आहे.