राहुल गांधींनीचं आम्हाला पक्षाबाहेर ढकलल; राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितली खरी कहाणी ! 2019 ला विखे यांच्यासोबत काय घडलं ? वाचा…

महाविकास आघाडी आणि महायुती मधील पहिल्या फळीचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच, अहिल्यानगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ते भाजपात का अन कोणामुळे सामील झालेत ? याबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Tejas B Shelar
Published:
Radhakrishan Vikhe Patil News

Radhakrishan Vikhe Patil News : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय सनई चौघडे वाजत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. दोन्ही गटांच्या उमेदवारांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती मधील पहिल्या फळीचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच, अहिल्यानगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ते भाजपात का अन कोणामुळे सामील झालेत ? याबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही गंभीर आरोप केलेत.

एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधी यांनीचं मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं असं म्हणतं अनेक खुलासे केलेत. ते म्हणालेत की सुजयच्या निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी त्याला राष्ट्रवादीकडून उभे राहण्यास सांगितले.

आम्ही मात्र जागांची अदलाबदल करावी असं म्हणत होतो. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस सलग ३ वेळा हरली होती. यामुळे, मी शरद पवारांना दोनदा भेटलो ते म्हणालेत माझे कार्यकर्ते ऐकत नाही. मग, मी राहुल गांधींना भेटलो, खरगेही तिथे हजर होते.

त्यावेळी सुजय राष्ट्रवादीकडून का लढत नाहीत ? असं राहुल गांधींनी म्हटले. जर काँग्रेसचे अध्यक्षच असं बोलत असतील तर पुढे आम्ही काय करायंच? यामुळे मग आम्ही भाजपात प्रवेश केला, असं म्हणतं काँग्रेस सोडण्यासाठी राहुल गांधीच जबाबदार होते असे यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलतांना त्यांनी, राहुल गांधी यांच्या भेटीनंतर मी सुजयला फोन केला, तू देवेंद्र फडणवीसांशी बोलून निर्णय घे. जिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांचे ऐकत नाही. तिथे आम्ही राष्ट्रवादीचं तिकिट घेऊन लढायचं याचा अर्थ राजकीय आत्महत्या केल्यासारखे आहे असं म्हणतं विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण यावेळी सांगितले.

यामुळे सध्या राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या मुलाखतीची नगरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपात येण्याचे कारण नमूद करताना त्यांनी राहुल गांधी यांनाच त्यांच्या पक्ष बदलासाठी जबाबदार धरले असल्याने त्यांच्या या मुलाखतीची सध्या नगरसहित संपूर्ण राज्यात चर्चा होताना दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe