महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यात मराठा समाजाचे एक लाख युवकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीने अर्थसहाय्य देऊन नव उद्योजक बनविले. महा आघाडीचे नेते राज्यकर्ते होते, त्यावेळेस आण्णासाहेब पाटील महामंडळ शेवटच्या घटका मोजत होते.
आरक्षणाचे राजकारण करणाऱ्यांनी त्यांची सत्ता असताना आरक्षण का दिले नाही. पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीने तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता.
यावेळी गुजरातचे आमदार महेशजी कासवाल, संकेत कळंबे, बापूसाहेब भोसले, कृष्णा राजळे, अशोकराव गायकवाड, विवेक नाईक, भीमराज सागडे, उमेश भालसिंग, सागर फडके, जे. बी. वांढेकर, महेश फलके,
मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर मरकड यांच्यासह शेकडो युवा उद्योजक उपस्थीत होते.पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, राज्याच्या प्रत्येक तालुक्यात एक हजार उद्योजक आण्णासाहेब पाटील मंडळामार्फत तयार करण्याचा मानस आहे. महायुतीच्या सरकारच्या काळात सारथी, बार्टी महाज्योतीच्या माध्यमातून शैक्षणिक मदत मिळालेली आहे.
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या व केंद्राच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. नवउद्योजक घडविण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आले पाहीजे.
आमदार मोनिका राजळे यांनी गेल्या दहा वर्षात चांगली विकासाची कामे केली आहेत त्यांना पुन्हा निवडून देऊन हँट्रीक करावी असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खरड, सूत्रसंचालन सोमेश्वर शेळके यांनी केले.