Radhakrishana Vikhe Patil News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लवकरच निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे.
अशा परिस्थितीत सध्या राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले दिसते. दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल वांबोरी चारी टप्पा 2 चे भूमिपूजन केले.
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
या कार्यक्रमावेळी बोलताना नामदार विखे पाटील यांनी, ‘पुणे जिल्ह्याने नेहमीच नगर जिल्ह्यावर अन्याय केलाय. त्यांनी नेहमीच आपल्या जिल्ह्याच्या जीवावर राज्यात राजकारण केले आहे आहे पण शरद पवार यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान काय?’, असा सवाल उपस्थित केला आहे.
पवार यांनी नेहमीच आपल्या जिल्ह्याच्या जीवावर राज्यात राजकारण केले आणि आपण त्यांचे फोटो लावणार का ? असे म्हणतं नामदार विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विखे पाटील यांनी जुन्या आठवणींना ही उजाळा दिला.
ते म्हणालेत की, 1991 च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार हे हेलिकॉप्टरने नगर जिल्ह्यामध्ये आले होते, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना हेलिकॉप्टरच्या खाली उतरून दिले नव्हते, असं म्हणतं त्यांनी शरद पवार यांच्यावर चौफेर टोलेबाजी केली.
एवढेच नाही तर यावेळी विखे पाटील यांनी जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर राज्यात सुरू असणाऱ्या सर्व योजना बंद होतील असाही आरोप केला आहे. यावेळी विखे पाटील यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवाजीराव कर्डिले हेच करणार असेही स्पष्ट केले.
छत्रपती संभाजी नगर आणि अहिल्यानगरच्या नामांतरणाला शरद पवार यांनी विरोध केलाय, ते फक्त मतासाठी राजकारण करतात अशीही टिका विखे पाटील यांनी केली.