Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केले होते. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या प्रकरणी राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती.असे असताना मात्र राहुल गांधी यांनी या नोटिशीला काहीच उत्तर दिले नव्हते. यामुळे आता दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचली आहे.

याबाबत स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, आम्ही राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. त्यांनी श्रीनगरमध्ये एक विधान केले होते. अनेक महिला मला भेटल्या. त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले होते.
आम्ही याचीच माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. कारण त्या महिलांना न्याय मिळावा हा आमचा हेतू आहे, असे सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले. महिलांचे लैंगिक शोषण होत आहे. आमच्याकडे तशा तक्रारी आल्या आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
आता पोलिसांनी या विधानाची दखल घेत राहुल गांधी यांना नोटीस बजावली. आम्हाला त्या महिलांचीन नावे द्या. त्यांची माहिती द्या. म्हणजे आम्हाला कारवाई करता येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे.