सातारा, सांगली, कोल्हापूरहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘हे’ दोन दिवस बंद राहणार ‘हा’ मार्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune-Bengalore Highway : राज्यात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. तसेच ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत त्यांच लोकार्पण देखील केलं जात आहे. सोबतच काही महामार्गाची दुरुस्ती देखील सुरू आहे. दरम्यान आता सातारा, सांगली, कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता मुंबईच्या दिशेने या तिन्ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.

कामानिमित्त उद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच फिरण्यासाठी जाणारे पर्यटक हजारोच्या संख्येने रोजाना मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. अशा प्रवाशांना मात्र 23 आणि 24 मार्च रोजी प्रवास करताना पुणे बेंगलोर महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यामधून प्रवास करता येणार नाहीये. हा नवीन बोगदा 23 आणि 24 मार्च रोजी तब्बल सहा तास बंद राहणार आहे.

हे पण वाचा :- महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत लागू; पण ‘या’ महिलांना मिळणार नाही याचा लाभ, वाचा याविषयी सविस्तर

यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागणार आहे. ही वाहतूक कात्रज मार्गे वळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन कात्रज बोगद्यामध्ये नवीन यंत्रणा बसवण्याचे काम सुरू असल्याने हे दोन दिवस सहा तास वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पुणे – बेंगलोर महामार्गावरील व्हीएमएस आणि व्हीएसडी यंत्रणा बसवण्याच काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नवीन कात्रज बोगदा 23 मार्चला रात्री 11 वाजेपासून ते 24 मार्च 2023 ला पहाटे 2 वाजेपर्यंत वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! पालखी मार्गात होणार बदल? या एका कारणामुळे रूटमध्ये बदल होणार

हा बोगदा तीन तास सातारा ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून समोर आली आहे. या वेळी साताऱ्याकडून होणारी वाहतूक ही जुना कात्रज बोगद्यापासून कात्रज चौक, नवले पूल, विश्वास हॉटेलमार्गे सर्व्हिस रोडने मुंबईच्या दिशेने वळवण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून आखण्यात आल आहे.

मात्र असे असले तरी मुंबईहून साताऱ्याकडे जाणारी वाहने नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. निश्चितच हे दोन दिवस साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना नवीन कात्रज बोगद्यामार्गे जाता येणार नसल्याने प्रवाशांनी याची काळजी घ्यायची आहे. 

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! केंद्र सरकार 20 लाख लोकांना देणार रोजगार, महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न होणार दूर; पहा केंद्राची भन्नाट योजना आहे तरी नेमकी काय?