Rahul Gandhi : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे.
असे असताना आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. न्यायालयाचा निर्णय येताच एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो बदलला आहे.
त्यानंतर सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलण्यास सुरुवात केली. काँग्रेसने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट यांसारख्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे. ज्यावर लिहिलं आहे की ‘डरो मत’.
राहुल गांधी यांचा हा फोटो भारत जोडो यात्रेदरम्यान काढण्यात आला होता. दरम्यान, याबाबत गुजरात भाजपा आ. पूर्नेश मोदींनी दाखल केलेली याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुरत न्यायालयात केस सुरू होती. त्यावर निर्णय आला असून सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आहे.
राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. दरम्यान, राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा मोदी सरकारचा हा डाव आहे, या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभर जेलभर आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना सांगितले.
यामुळे पुन्हा एकदा भाजप- काँग्रेस नेते एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. याबाबत राहुल गांधी यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.