Rahul Gandhi : ज्या सभेतील वक्तव्यामुळे खासदारकी गेली, तेथेच शड्डू ठोकणार, राहुल गांधी यांनी आखली रणनीती..

Published on -

Rahul Gandhi : सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. संपूर्ण काँग्रेससाठी हा धक्का आहे. असे असताना राहुल गांधी यांनी भाजपविरोधातील राजकीय लढाई आणखी तीव्र करण्याचे ठरवले आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबद्दल ज्या मतदारसंघात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याच मतदारसंघातून ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

राहुल गांधी यांनी 2019 साली कोलारमध्ये केलेल्या भाषणामुळे त्यांना कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांनी कोलारमध्ये मोदी आडनावाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या सगळ्या घडामोडींनतर राहुल गांधी आता कोलारमध्ये काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत दिल्लीतून तयारी सुरू आहे. राहुल गांधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी राज्यात दाखल होणार आहेत. राहुल गांधी 5 एप्रिलला कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत.

ते 5 एप्रिलपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ करणार आहेत. यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे सर्व पक्षाने यासाठी तयारी सुरू केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe