Rahul Gandhi : सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टीका टिप्पणी केली जात आहे. अशातच कर्नाटकमधील एका भाजपा नेत्याने राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मुल जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतिल यांनी केले आहे.
यामुळे आता काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे. तसेच यावेळी राहुल गांधींबरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीका केली आहे. राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांनी लोकांना कोरोनाची लस न घेण्याचे आवाहन केले होते. लस घेतल्याने मुल होणार नाहीत. अपंगत्व येऊ शकत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, निलम कुमार कतिल यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सूरजेवाला यांनी कतिल यांना जोकर म्हटले आहे. यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
ते म्हणाले, कर्नाटक भाजपाच्या सर्कसमधील जोकर शाब्दिक जुलाबाने त्रस्त आहेत. ते काहीही बरळत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या विधानावरून आता राजकीय टीका होत आहेत.
दरम्यान, त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने चर्चेत राहण्यासाठी अशी विधान करतात. त्यांना गांभीर्याने घेऊ नये, असं प्रत्युत्तर रणदीर सुरजेवाला यांनी दिलं आहे. यामुळे आता काँग्रेस भाजपमध्ये हा वाद सुरूच राहणार आहे.