Rahul Kalate : राहुल कलाटे यांचा होणार शिवसेनेत प्रवेश

Ahmednagarlive24 office
Published:
Rahul Kalate

Rahul Kalate : महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे.

परंतु, अद्याप कलाटे यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. राहुल कलाटे माजी शिवसेना शहराध्यक्ष आणि पालिकेतील माजी गट नेते आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नव्हती.

परंतु, त्यांनी सलग तीन वेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. नुकत्याच झालेल्या २०२३ च्या पोटनिवडणुकीत कलाटे यांची महाविकास आघाडीत बंडखोरी करून रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली होती.

या निवडणुकीत त्यांना तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. २०१७ मध्ये वाकडमधून ते पहिल्यांदाच पालिकेवर निवडून आलेले आहेत. दरम्यान, कलाटे यांनी समर्थक माजी नगरसेवक नवनाथ जगताप, संपत पवार,

अश्विनी वाघमारे यांच्यासह रविवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी व शिवसेना नेत्यांनी कलाटे शिवसेनेत प्रवेश करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, अद्याप त्यांचा प्रवेश झालेला नाही.

पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा

कलाटे यांच्यासारखा चांगला सहकारी भविष्यात मिळणार आहे, याचा मनापासून आनंद आहे. तसेच, स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत चर्चा करुन ते दिशा ठरविणार आहेत. असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कलाटे यांच्या प्रवेशावरून बोलताना म्हटलेले आहे. त्यामुळे तुर्तास कलाटे यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा होत असली, तरी लवकरच त्यांचा शिवसेना प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मी सहकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली सर्वसामान्य जनतेशी मिसळणारा मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची प्रतिमा आहे. त्यांच्या नेतृत्वखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नेते, खासदार चर्चा करुन पुढे कसे काम करायचे याची दिशा ठरवतील – राहुल कलाटे, माजी गटनेते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe