Raj Thackeray : ‘पुण्यातील मनसेच्या कार्यालयासमोर मशीद उभी राहिली, त्याचे काय?’

Published on -

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. यानंतर लगेच तेथे कारवाई करण्यात आली. यामुळे याची जोरदार चर्चा झाली. याबाबत हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. पण माहीममधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत का दिली? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच ते म्हणाले, तसेच पुण्यातील मनसेच्या जुन्या कार्यालयासमोर अशीच मशीद उभी राहिली त्याचं काय? असा सवालही आनंद दवे यांनी केला. तसेच ते म्हणाले, राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीचा देखील मुद्दा उपस्थित करावा. यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित झाला आहे.

याबाबत ते म्हणाले, औरंगजेब महाराष्ट्राचा शत्रू. त्याची कबर संभाजीनगरमध्ये कशाला हवी? राजसाहेब प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत. औरंगजेबच्या कबरीबद्दल त्यांनी निर्णय घ्यावा. राज ठाकरे यांनी पुण्यश्लोक आणि शनिवार वाड्यातील दर्ग्याचा मुद्दा का नाही उचलला? असेही ते म्हणाले.

याबाबत शनिवार वाड्यातील दर्गा देखील अनधिकृत आहे. त्याविरोधात हिंदू महासंघ आंदोलन करणार असल्याची घोषणा आनंद दवे यांनी केली आहे. यामुळे आता यावरून पुण्यात देखील राजकारण सुरू आहे.

मुस्लिम समाजाबाबत राजसाहेब थोडे मवाळ झालेत. भाजपला मैदान मोकळ झाले आहे, असेही ते म्हणाले. समुद्रातील अनधिकृत मशिदीचा विषय भोंग्यासारखा होऊ नये. दर पाडव्याला फक्त सरकारला सूचना देऊ नका, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe