Raj Thackeray : मोठी बातमी! मनसेचा ठाकरे गटाला दणका, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी..

Published on -

Raj Thackeray : मुंबईत सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यानंतर सध्या मनसेकडून देखील उद्धव ठाकरे यांना धक्का दिला गेला आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेत मुंबईच्या दिंडोशी विधानसभा भागातील शिवसेना ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मनसे दिंडोशी विभाग अध्यक्ष भास्कर परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना ठाकरे गटाचे अनेक उपशाखा प्रमुख आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी आज मनसेत प्रवेश केला. याचा मनसेला आगामी काळात फायदा होणार आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात गेल्या आठ महिन्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांचा गट वेगळा झाल्याने शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला. यामुळे मोठा राडा सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून हे झटके मिळत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठाकरे गटाला मोठा झटका देण्यात आला आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात निवडणुकीत काय चित्र दिसणार हे लवकरच समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe