Raj Thackeray : मनसेचा १७ वा वर्धापन दिन काल झाला. त्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी संदीप देशापांडे यांना स्टेजवर बोलवत हल्लेखोरांना इशारा दिला.
राज ठाकरे स्टेजवर बोलत असताना म्हणाले, हल्ला झाल्यानंतर मला अनेकांनी विचारले. तुम्हाला काय वाटते, कुणी हल्ला केला असेल. त्यावेळी मी बोललो नाही. मात्र, एक निश्चित सांगतो. हे ज्यांनी केले त्यांना आधी कळेल, आणि नंतर इतरांना कळेल, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.
तसेच ते म्हणाले, माझ्या मुलांचे असे रक्त मी वाया जाऊ देणार नाही, आमचा राजू पाटील, पक्षाची बाजू आज विधानसभेत एकटा मांडतो आहे. एकही है लेकिन काफी है. ती विधानसभा भरून गेली तर काय होईल, असेही ते म्हणाले.
आम्ही आंदोलने अर्धवट सोडली, म्हणतात एकतरी आंदोलन दाखवा. भाजप आणि शिवसेनेने त्यांच्या जाहिरनाम्यात टोल मुक्तीची घोषणा केली होती. त्याचे पुढे काय झाले. आणि तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात, असेही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपाडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये हल्ला झाला होता. त्यावरुन राज ठाकरे यांनी हल्लेखोरांना इशारा दिला. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.