Raj Thackeray : सध्या मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, शिवसैनिक यांच्या माध्यमातूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट जीवे मारण्याची सुपारी दिली गेली होती. यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे.
ते म्हणाले, मुंबईतल्याच गुंडांकडे शिवसेना पक्षाच्या माध्यमातूनच राज ठाकरेंना जीवे मारण्याची सुपारी दिली गेली होती. तसेच मालवण इथे राज ठाकरे यांचे घातपात घडवण्याचे षडयंत्र रचण्याचा त्यांचा डाव होता, असा मोठा खुलासा त्यांनी केला आहे.
आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढायचा, अशा प्रकारचे नीच पद्धतीचे राजकारण झाले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव पुढ याव यासाठीच हा घातपात मालवण या ठिकाणी अशा पद्धतीच्या घातपाताचे षडयंत्र रचले जाणार होते.
दरम्यान, 1995 या एकाच वर्षी राज ठाकरे यांनी पक्षासाठी एकूण 80 सभा घेतल्या होत्या. सलग तीन महिने राज ठाकरे हे पक्षासाठी सभा घेत फिरत होते. जेव्हा 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आली, तेव्हा उद्धव ठाकरे यांना सत्तेचे स्वप्न पडत होते.
तसेच मुख्यमंत्री पदाची स्वप्ने उद्धव ठाकरेंना पडायला लागली, असाही दावा देशपांडे यांनी केला आहे. यामुळे आता यावर शिवसेनेकडून काय उत्तर येणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सध्या अशा आरोपांची मालिका सध्या राज्यात सुरू आहे. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे सध्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.