Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महानगरपालिका निकडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, मला एका पत्रकाराने विचारलं, तुमची ब्लू फिल्म जी आलेली आहे. मी म्हटलं, ती काढली असती, तर बरं झालं असतं, यांनी बघितली तरी असती, असे म्हणत त्यांनी सभागृहात हशा पिकवला.
यावेळी त्यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेना यासह विविध विषयांवर भाष्य केले. तसंच गुढीपाडवा मेळाव्याची झलकही दाखवली. राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडणारा देशातील पहिला राजकीय पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ अशी स्लाईड यावेळी दाखवण्यात आली.
त्यावर राज ठाकरे किंचित हसले आणि किस्सा सांगू लागले. यावेळी मनसेच्या वाटचालीची माहिती देणारी डिजिटल पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. राज ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका जेव्हा लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार, मी फक्त आशा दाखवत नाही. मला माहिती आहे. आपल्याला महानगरपालिका जिंकायच्या आहेत. असेही ते म्हणाले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण सत्तेत असणार म्हणजे असणार, असे म्हणत राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. बहुमत हाती यायला भाजपाला १९५२ ते २०१४ इतका वेळ वाट पाहावी लागली, असेही ते म्हणाले.