Raj Thackeray : सध्या पनवेल येथे मनसेच्या वतीने राजभाषा दिनाचे आयोजन केले आहे. यामध्ये आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यात आज राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावर त्यांना एक राजकीय प्रश्न विचारण्यात आला. यामुळे याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय पाहता उद्या मनसेचा एकमेव आमदारही पक्षावर दावा करू शकतो, असे राज ठाकरे यांना विचारण्यात आले. यावर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही. पण काळ सोकावतोय. 22 तारखेला गुढीपाडव्याला या विषयावर सविस्तर बोलणार आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच ते म्हणाले, मला ट्रेलर, ट्रिझर दाखवायचा नाही. मी शेवटचाच सिनेमा दाखवणार आहे, असेही ते म्हणाले. यामुळे आता ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
त्यामुळे देशाच्या राजकारणातच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर मनसे कोणाची होणार असा प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे निवडणूक आयोगावर टीका देखील केली जात आहे.