Raj Thackeray : रात्री राज ठाकरे यांचा इशारा, आणि सकाळी मजारीवर हातोडा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त..

Published on -

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. या सभेत त्यांनी माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता. त्यांनी यावेळी इशारा दिला होता. ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता.

असे असताना दुसऱ्या दिवशीच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अखेर हे अतिक्रमण हटवले आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसेच अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जेसीबी मशीनच्या सहाय्याने अनधिकृत मजार जमीनदोस्त करण्यात आली. सर्वात आधी या मजारीवरील झेंडा हटवण्यात आला. त्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली.

सकाळी 8 वाजता पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली.दरम्यान काल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली. तसेच शिंदे सरकारला देखील टोले लगावले.

उद्धव ठाकरे हे लोकांना सहानुभूती मिळवण्यासाठी सांगत फिरत आहेत. पण हे सांगण्याआधी जर तुम्ही काय राजकारण केलं हे सांगा, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. आता उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe