Raj Thackerays car : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. यामुळे या गाड्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. राज ठाकरे यांच्या ताफ्यात काल टोयोटा कंपनीची नवी लँड क्रूझर दाखल झाली आहे. या कारची किंमत जवळपास चार कोटी रुपये आहे.
तसेच या गाड्यांचे नंबर देखील सारखेच म्हणजेच 9 हा नंबर आहे. राज ठाकरे यांच्याकडील सर्च गाड्याचे नंबर हे सारखेच आहेत. तसेच 15 दिवसांपूर्वी त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठीही नवी गाडी टोयोटा वेल्फायर कार खरेदी केली होती. याचे देखील फोटो व्हायरल होत आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच मर्सिडीजची सेडान कार आहे. ते नेहमी याच कारने प्रवास करताना दिसतात. स्वत: कार चालवण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. त्यांना कारची आवड असल्याने वेगवेगळ्या कार त्यांच्याकडे आहेत.
२००९ मध्ये त्यांनी सेडान कारसह टोयोटाची लँड क्रुझर एसयूव्ही कार खरेदी केली होती. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या गाड्या या बुलेटप्रुफ आहेत. त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे सेडान कारसह टोयोटाची जुन्या पिढीतील लँड क्रुझर एसयूव्ही कारही आहे.
दरम्यान, राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी नवीन घरात राहायला गेले आहेत. तसेच सध्या ते भाजपशी युती करतील असेही सांगितले जात आहे. यामुळे आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.