Raju Shetty : तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑफर राजू शेट्टींनी नाकारली, काय होती ऑफर?

Raju Shetty : सध्या तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे. सध्या ते भारतात फिरत असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी देशातील विविध राज्यांत आपल्या पक्षाचा प्रवेश करतानाच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस विरहीत आघाडीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. तेव्हा काही माजी आमदारांनी देखील त्यांच्या पक्षात प्रवेश केला होता. तसेच त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करा अशी विनंती केली होती.

असे असताना मात्र राजू शेट्टी यांनी त्यांची ऑफर नाकारली आहे. ते म्हणाले, तेलंगणा राज्याचा विकास कसा झाला याबाबत माझी आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची बैठक झाली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्या पक्षाचा राष्ट्रीय राजकारणात समावेश झाला आहे.

तसेच त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे प्रमुख पद घेऊन, आमच्या पक्षात यावे अशी विनंती चंद्रशेखर राव यांनी केली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. मात्र मी शेतकरी चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता असल्याने त्यांची ऑफर नाकारल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे.

तसेच तुमची योजना चांगली आहे, भूमिका देखील योग्य आहे. असेही राजू शेट्टी यांनी त्यांना सांगितले आहे. यामुळे आता कोणता मोठा नेता हा त्यांच्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या कोल्हापूरचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकर यांचे नाव देखील चर्चेत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe