Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नागालँडच्या 60 विधानसभा जागांवर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. याठिकाणी पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. यामुळे त्यांच्या पक्षाची ताकद आता वाढत आहे.
नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर दोन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार इम्तिचोबा हे विजयी झाले आहेत. तसेच नागालँड च्या नोकसेन विधानसभा मतदारसंघात उमेदवार वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत.

नागालँड मध्ये गन्ना किसान या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक 8 ठिकाणी लढली. त्यात 2 उमेदवार विजयी झाले. अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
दरम्यान, मध्यवर्ती कार्यालय आझाद मैदान मुंबई येथे विजयी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली. ईशान्येकडील तीन राज्य त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस झाली.
दरम्यान, वरील तिन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत सहभागी आहे. मेघालयात 2018 साली भाजपने नॅशनल पीपल्स पार्टीसोबत सत्ता स्थापन केली होती. तर, नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने भाजपच्या सोबत मिळून सत्ता स्थापन केली आहे.