Ramraje Naik Nimbalkar : फलटण येथील वाठार निंबाळकर येथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली.
रामराजे म्हणाले, की याआधी चिमणराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर, आम्ही एकमेकांवर थेट बोलत होतो. असे असताना मात्र सध्याचे खासदार भांडायला तिसराच माणूस घेऊन येतात. तो मला बोलतो आणि खासदार गप्प बसतात.

यामुळे खासदार आमदाराचे पी. ए. झाले असून त्यांचं काय राजकारण सुरू आहे, हे मला कळत नाही, असे रामराजे म्हणाले. एका खासदाराच्या पोटात सहा आमदार असतात. परंतु फलटण तालुक्यातील उलटच झाले आहे, असेही ते म्हणाले.
आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार गोरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे लवकरच समजेल. यावरून फलटणमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, रामराजे यांनी मोठा शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्याला या परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते. रामराजे यांनी प्रयत्न करून परिसरात पाणी आणले आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.