मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे महापिलाकेमध्ये मोठं खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेक ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेनेमध्ये फक्त एक नगरसेवक राहिला आहे. यावरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख … सौ दाऊद,एक राऊत…, असे ट्विट करत गजानन काळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेचे नेते खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.