Ravindra Dhangekar : ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5, 10 टर्म हलत नाही’

Published on -

Ravindra Dhangekar : कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून आता पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

नगरसेवक ते आमदार असा प्रवास सुरू झालेले कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी माझं जनतेवर प्रेम आहे आणि जनता माझा परिवार आहे, असे म्हटले आहे.

याच परिवाराचा आशीर्वाद गेली नऊ निवडणुकांत मला मिळत आहे. आता तर मला विधानसभेत पाठवले आहे. त्यांची सेवा करणे, चांगले काम करणे हेच ध्येय असेल. असेही यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. धंगेकर यांच्या विजयामुळे मविआला एक नवी संजीवणी मिळाली आहे.

तसेच यामुळे 2024 ला काय भूमिका असेल. यावर धंगेकर यांनी ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5, 10 टर्म हलत नाही’ असे म्हटले आहे. यामुळे आता पुण्यातील भाजप नेत्यांचे टेंशन वाढले आहे. यामुळे 2024 ला काय गणित असणार हे लवकरच समजेल.

दरम्यान, पोट निवडणुकीत धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. यामुळे आता सगळ्यांचे लक्ष 2024 च्या निवडणुकीकडे लागले आहे. धंगेकर हे खासदारकी लढवणार असेही म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe