Ravindra Dhangekar : पुण्यातून सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतून उठून गेले. पालकमंत्री पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदारांपेक्षा भाजपचे पदाधिकारीच जास्त बोलत होते.
त्यामुळे आमदार धंगेकर हे बैठकीतून मध्येच निघून गेले. धंगेकर हे अचानक बैठकीतून निघून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बैठकीत निमंत्रित आमदारांपेक्षा भाजपचे स्थानिक पदाधिकारीच जास्त बोलत होते. त्यामुळे आपण बैठकीतून उठून गेलो, असेही धंगेकर म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील विविध विषयासंदर्भात महापालिका अधिकारी व सहा आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीचा ताबा हा भाजपच्या कार्यकर्त्यांनीच घेतला होता, त्यामुळे आपण या बैठकीतून निघून गेलो.
मला देखील माझं मत व्यक्त करायचे होते. पण या बैठकीतील हा प्रकार पाहून आपण निघून आलो, असे धंगेकर म्हणाले. या बैठकीत बैठकीत शहरातील रस्ते, नदी सुधार प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, पाण्याच्या योजनेबाबत चर्चा होणार होती, मात्र तसे झाले नाही.
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी धंगेकर कोण आहे? असे म्हटले होते. याच्या अनेक विडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होत्या. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील आणि धंगेकर हे समोरासमोर आले होते.