कर्डिले पिता-पुत्रांना दिलासा ! धमकवण्याचा ‘त्या’ फिर्यादीवर न्यायालयाचा ‘हा’ आदेश

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : धमकवण्याच्या एका प्रकरणात माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचा मुलगा अक्षय याना दिलासा मिळाला आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने या दोघांविरोधात खासगी फिर्याद दाखल करून तपास करण्याचा आदेश याआधी दिलेला होता.

कर्डीले यांनी याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. यावर आता प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी प्रथम वर्ग न्यायालयाचा हा आदेश रद्द केला असल्याचे समजते.

* नेमका काय घडला होता प्रकार

ॲड. अभिषेक भगत हे बुऱ्हाणनगर येथील रहिवाशी असून त्यांना नवरात्र उत्सवात (२२ सप्टेंबर २०२२) रोजी धमकावण्यात आले होते. भगत यांनी याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेतली. परंतु या तक्रारीची दखल मात्र पोलिसांकडून घेतली गेली नाही.

त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना २३ सप्टेंबर २०२२ रोजी धमकावण्यात आले. धमकवण्याचा प्रकार पुन्हा २४ फेब्रुवारी २०२३ रोजी घडला. या दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फोन करून कर्डिले यांच्या वतीने त्यांना धमकावले असल्याचा रोप करण्यात आला होता.

त्यानंतर मात्र ॲड. भगत यांनी या घटनांच्या आधारे अहमदनगर येथील प्रथम वर्ग न्यायालयात खासगी फिर्याद दिली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्रमांक ८ यांनी कोतवाली पोलिसांना फौजदारी न्यायप्रक्रिया संहितेच्या १५६ (३) कलमातील तरतुदीअन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला होता.

* कर्डिले पिता-पुत्रांची जिल्हा सत्र न्यायालयात धाव

प्रथम वर्ग न्यायालयाच्या आदेशानंतर कर्डिले पिता-पुत्रांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांनी पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. यावर न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेतली आणि घेऊन प्रथम वर्ग न्यायालयाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली गेली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe